नवी दिल्ली : श्रीलंकेविरूद्धच्या तिस-या टेस्टमध्ये करिअरमधील पहिलं शतक झळकावणारा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरला नवी दिशा देणा-या वडिलांना धन्यवाद म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकने वडिलांना एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट देऊन आभार व्यक्त केले आहे. हार्दिकने वडिलांनी एक खास सरप्राईज दिलं. यात त्याचा भाऊही सामिल होता. 




२३ वर्षीय पांड्याने एकापाठी एक अनेक ट्विट्स करून त्याच्या वडिलांना धन्यवाद म्हणाला आहे. तो म्हणाला की, ‘त्याच्या वडिलांना जीवनातील सर्वच आनंद मिळाला पाहिजे. क्रिकेटच्या मैदानातील त्याच्या यशाचं श्रेय त्याने त्याच्या वडिलांना दिलंय. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात हे सरप्राईज कैद करण्यात आलंय. 


हार्दिक पांड्याचे वडील आणि त्याचा भाऊ एका कारच्या शोरूममध्ये गेले आहेत. आणि व्हिडिओ कॉलवरून हार्दिक त्यांच्याशी बोलतो आहे. एका शानदार कारजवळ त्याचे वडील उभे आहेत आणि हार्दिक त्यांना ही कार तुमची असल्याचे सांगत आहे. या सरप्राईज गिफ्टने हार्दिकचे वडील किती आनंदी झाले होते, हे यात बघायला मिळतं.   


पांड्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘वडिलांच्या चेह-यावर इतका आनंद पाहून मला आनंद होतो. माझ्या आणि कॄणालच्या करिअरसाठी त्यांनी सर्वकाही सोडलं. यासाठी खूप मोठी हिंमत लागते’.





‘त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी त्यांचे जितके आभार मानू तितके कमी आहे. हे त्यांच्यासाठी एक छोटसं सरप्राईज आहे. कुटुंब खास असतं. हे माझ्या भावामुळे शक्य झालंय. कारण मी तिथे नव्हतो’.