नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांडया टीममधील सर्वात यशस्वी खेळाडूंमधील एक आहे. पैसा, प्रसिद्धी त्याच्या पायाजवळ लोळण घेत आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा वाईट परिस्थितीत त्याला दिवस काढावे लागत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेळ इतकी खराब होती की त्याला ईएमआय भरायलाही पैसे जवळ नव्हते. त्यामूळे त्याने आपली कार लपविली होती. 


दिलखुलास गप्पा 


 गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स' शो मध्ये त्याने आपल्या काटकसरीच्या आयुष्याबद्दल दिलखुलास गप्पा  मारल्या.


पाच,दहा रुपयांची बचत 


आयपीएलमध्ये डेब्यू होण्याआधी त्याला कोणकोणत्या प्रसंगाना सामोरे जावे लागले हे  यावेळी पांड्याने सांगितले.


कारचा ईएमआय भरण्यासाठी पांड्याला ३ वर्ष संघर्ष करावा लागला. यासाठी त्याने पाच ते दहा रुपयांपासून बचत केली होती.


३ वर्षांचा संघर्ष 


 'आयपीएल मॅच वेळी मला ७० हजार रुपये मिळाले होते. त्यावरच गुजराण करायची होती. किमान ३ वर्षे तरी असाच संघर्ष करावा लागला.


दोन वर्षे कारचे ईएमआय भरण्यासाठी जवळ पैसे नव्हते, त्यामूळे कार लपविल्याचे पांड्याने सांगितले. आपली कार आपल्याकडून हिसकावून घेऊन जावू नये असे वाटत होते. 


कार आणि जेवण महत्त्वाचे


 त्या ३ वर्षात जे काही कमावले त्यात कार वाचवणेही महत्त्वाचे होते. त्यावेळी कार आणि जेवण याच गोष्टींना प्राधान्य होत.


आयपीएलमध्ये माझ पहिल वर्ष होतं आणि मुंबई इंडियन्स जिंकली.मला ५० लाख रुपये मिळाले. १ कार फ्री मिळाली. मी एक नवी कारही घेतली असे पांड्या सांगतो.