Rohit Sharma: आयपीएलमध्ये आज वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात सामना रंगला आहे. गेल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव केला होता, त्यामुळे या सामन्यात पलटण बदला घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. या सामन्यात टीम इंडियाचे ( Team India ) दोन्ही कर्णधार आमनेसामने आहेत. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताय. हा व्हिडीओ हिटमॅनच्या ( Hitman ) चाहत्यांना आवडणार नाहीये.  


जुन्या टीमला भेटला Hardik Pandya


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. मात्र गुजरातपूर्वी तो मुंबई इंडियन्सच्या टीमकडून खेळायचा. आजच्या सामन्यापूर्वी हार्दिक त्याच्या जुन्या टीमच्या साथीदारांना भेटला. मात्र यावेळी कर्णधार रोहित शर्मासोबतचा ( Rohit Sharma ) त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


वानखेडेच्या मैदानावर आयपीएलमधील 57 वा सामना रंगला. यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही टीम्स प्रॅक्टिस करत होत्या. यावेळी हार्दिक पंड्याने मुंबईच्या खेळाडूंची भेट घेतली. मात्र यावेळी त्याने रोहितची भेट घेतल्याचं दिसलं नाही. यामुळे सोशल मीडियावर हार्दिकने रोहितला इग्नोर केल्याचं म्हटलं जातंय. इतर खेळाडूंची भेट घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 



मुंबईच्या टीमवर माझं प्रेम- हार्दिक


हार्दिक पंड्या जरी गुजरात टायटन्स कडून खेळत असला तरीही त्याचं अजून मुंबई इंडियन्सच्या टीमवर प्रेम असल्याचं खुद्द हार्दिकने सांगितलंय. हार्दिक मुंबई इंडियन्सकडून जवळपास 7 वर्ष खेळला. नुकतंच एका व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला होता की, मुंबई इंडियन्स माझ्यासाठी खास टीम आहे. ही टीम म्हणजे माझ्यासाठी पहिल्या प्रेमाप्रमाणे आहे. 


आजच्या सामन्यात फलंदाजीमध्ये दोन्ही कर्णधार फेल


वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या रोहित शर्माकडून चाहत्यांनी मोठ्या खेळीची अपेक्षा केली होती. मात्र रोहित आज देखील चांगली खेळी करू शकला नाही. रोहितने ज्याप्रमाणे फलंदाजीला सुरुवात केली होती, त्यावरून आज तो उत्तम खेळेल अशी आशा बांधली जात होती. मात्र 29 रन्सवर रोहित शर्मा बाद झाला.


दुसरीकडे मुंबईने गुजरातला 219 रन्सचं टारगेट दिलं होतं. यावेळी साहाची विकेट गमावल्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला होता. मात्र त्यालाही जास्त वेळ क्रिजवर टिकता आलं नाही. 3 बॉल्समध्ये 4 रन्स करून त्यानेही पव्हेलियनचा रस्ता धरला.