मुंबई : आयपीएलचे सामने अधिक अटीतटीचे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंधराव्या हंगामातील 40 वा सामना गुजरात विरुद्ध हैदराबाद झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या हाताला दुखापत झाली. यावेळी स्टेडियममध्ये बसलेल्या पत्नीसोबत चाहते आणि टीममधील खेळाडूंचं टेन्शन वाढलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विरुद्ध हैदराबाद रोमांचक सामना झाला. या सामन्यात हैदराबादला गुजरातने 5 विकेट्सने धूळ चारली. हार्दिक पांड्याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या बॅटमधून या सामन्यात काही खास धावा निघाल्या नाहीत. 


हार्दिक पांड्या बॅटिंगसाठी मैदानात उतरला तेव्हा घातक बॉलर उमरान मलिक बॉलिंग करत होता. यावेळी त्याचा बॉल हार्दिक पांड्याच्या खांद्याला लागला. तेव्हा मैदानात काही सेकंद तणाव होता. हार्दिक पांड्याला गंभीर दुखापत तर झाली नाही ना? याची चिंता सर्वांना होती. 


पत्नी नताशा स्टेनकोविक तर पूर्ण टेन्शनमध्ये होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्या 10 धावा करून आऊट झाला. राशिद खाननं सिक्स ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला. 


राशिदने 3 सिक्स ठोकून गुजरातला शेवटच्या टप्प्यात विजय मिळवून दिला. गुजरातने 5 विकेट्सने हैदराबादवर मात करून राजस्थानला धक्का देत पॉईंट टेबलवर पुन्हा पहिलं स्थान मिळवलं आहे.