Hardik Pandya Injury: यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. यामुळे हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. अशातच आता एका माजी खेळाडूने हार्दिक पंड्याबाबत मोठं विधान केलं आहे. या दिग्गज व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पंड्या जखमी आहे, पण तो मान्य करत नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल यांनी हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याचं मत व्यक्त केलं आहे. यंदाच्या सिझनमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिकने गोलंदाजी केली. मात्र पुढच्या दोन सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूविरुद्धच्या पाचव्या सामन्यात हार्दिकने फक्त एकच ओव्हर टाकली. हार्दिकने स्वतःला गोलंदाजीपासून दूर ठेवल्याने मुंबईचा कर्णधार दुखापतग्रस्त असल्याची शंका सायमन डूलच्या मनात निर्माण होत आहे.


क्रिकबझला माहिती देताना सायमन डूल म्हणाले की, “पहिल्या सामन्यात पहिली ओव्हर टाकून तुम्ही एक उदाहरण सेट केलं आणि नंतर अचानक तुमची गरज नाही. तो जखमी आहे. मी तुम्हाला सांगतोय की काहीतरी चूक होतेय. तो ही गोष्ट मानत नाही. पण त्याच्यात काहीतरी चूक आहे. मला असीी गट फिलींग आहे.”


दिल्लीविरुद्ध गोलंदाजी न करण्याबाबत हार्दिकला विचारण्यात आलं. त्यावेळी हार्दिकने उत्तर दिलं की, तो 'योग्य वेळी' गोलंदाजी करणार आहे.


हार्दिकची दुखापत टीम इंडियासाठी बनणार डोकेदुखी?


हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे मुंबई आणि टीम इंडियासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आयपीएलनंतर टी-20 वर्ल्डकप जूनपासून खेळवला जाणार आहे. हार्दिकला खरोखर दुखापत झाली असेल, तर ती चिंतेची बाब आहे. मात्र त्याच्या संभाव्य दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात हार्दिक पंड्या काय विधान करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.