मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या अफेयरच्या चर्चांना सध्या उधाण आलेय. सुरुवातीला अशी बातमी होती की हार्दिक बॉलीवूड अभिनेत्री एली अवरामला डेट करतोय. मात्र त्यानंतर या लव्ह स्टोरीत उर्वशीची एंट्री झाली. मात्र हार्दिक आणि उर्वशीच्या अफेयरच्या बातमीत नवा ट्विस्ट आलाय. नुकत्याच एका पार्टीत हार्दिक पांड्याची भेट उर्वशीशी झाली. या पार्टीत दोघांमध्ये अॅटॅचमेंट पाहायला मिळाली. या पार्टीत हार्दिकचा भाऊही आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच एक पोस्ट उर्वशीने शेअर केली. यात तिने लिहिलय, urvashirautelaforeverThere’s no other love like the love for the brother. Missing my @yashrajrautela  #pandyabros . Good luck for @iplt20 #2018 


या पोस्टनंतर उर्वशी आणि हार्दिकच्या नात्याबाबत चर्चा आहे मात्र उर्वशीच्या पोस्टवरुन वेगळंच काहीतरी दिसतंय.



याआधी हार्दिक एलीसोबत बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसला होता. मात्र दोघांनी कधी रिलेशनशिपचा स्वीकार केला नाही. मात्र दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरु होत्या.


काही दिवसांपूर्वी मुंबईत हार्दिकने एलीसोबत अॅडही शूट केली होती. हार्दिकसोबच्या नात्याबाबत प्रश्न केला असताना एलीने कधीही नकार दिला होता. एका मुलाखतीत एलीने म्हटले होते की मी माझ्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे नाहीये.