मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे ऑलराऊंडर हार्दिक पांड्या टी-२० आणि वनडे सीरिजला मुकणार आहे. कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे पांड्या ही सीरिज खेळू शकणार नाही. वनडे सीरिजसाठी हार्दिक पांड्याऐवजी रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. पण टी-२० सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मायदेशातील या दौऱ्याला आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे. वर्ल्ड कपआधी भारताची ही शेवटची सीरिज असेल. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व एरॉन फिंचकडे सोपवण्यात आले आहे.


ऑस्ट्रेलिया टीम भारत दौऱ्यावर २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळण्यासाठी येत आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० सीरिजापासून होणार आहे. भारताकडून या टी- २० सीरिजसाठी मयांक मार्कंडेला संधी देण्यात आली आहे. टी-२० सीरिजसाठी टीम मध्ये केएल राहुलचं पुनरामन झालं आहे. २४ फेब्रुवारीपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे. 


टी-२० मालिकेसाठी भारतीय टीम  : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (कीपर), कृणाल पांड्या, विजय शंकर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्दार्थ कौल आणि मयांक मार्कंडे


पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडु, केदार जाधव (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहाल, कुलदीप यादव, विजय शंकर, ऋषभ पंत, सिद्दार्थ कौल आणि केएल राहुल


उर्वरित तीन वनडेसाठी भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडु, केदार जाधव, एमएस धोनी (कीपर), रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहाल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, विजय शंकर,  के.एल. राहुल, ऋषभ पंत


ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक


 


तारीख  मॅच  ठिकाण
२४ फेब्रुवारी पहिली टी-२० बंगळुरू
२७ फेब्रुवारी दुसरी टी-२० विशाखापट्टणम
२ मार्च  पहिली वनडे  हैदराबाद
५ मार्च  दुसरी वनडे नागपूर
८ मार्च तिसरी वनडे रांची
१० मार्च चौथी वनडे मोहाली
१३ मार्च पाचवी वनडे दिल्ली