गॉल :  टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याने कर्णधार विराट कोहलीचा निर्णय योग्य ठरविला आहे. विराटने चायनामन कुलदीप यादवला ड्रॉप करून त्याच्या जागेवर हार्दिक पांड्याची निवड केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याचा हा कसोटी पदार्पणाचा सामना होता. या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत अर्धशतकीय खेळी केली. पहिल्या सामन्यात अर्धशतक लगावून पांड्याने असा एक विक्रम आपल्या नावावर केला की तो आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही. 


पांड्याने आपल्या नावावर असा विक्रम केला आहे, जो कोणत्याही महान फलंदाजाला करता आलेला नाही. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांनाही असा विक्रम करता आलेला नाही. हार्दिक पांड्या असा पहिला भारतीय क्रिकेटर आहे की ज्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात तीन षटकार लगावले. 


हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांनी शेवटच्या तीन ओव्हरमध्ये चार षटकार लगावले. सुरवातीच्या १२२ षटकात एकही षटकार लगावण्यात आलेला नाही.