मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वन डे सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. मयंक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल आऊट झाले. यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. हार्दिक पांड्याने शिखर धवनबरोबर डाव सावरला आणि अर्धशतक झळकवले. यावेळी त्यांनी भारतासाठी इतिहासही रचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या फिनिशर म्हणून ओळखला जातो. त्याचा फॉर्म आयपीएल 2020 मध्येही दिसला होता आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही तेच दिसलं. या सामन्यात हार्दिक पांड्याने केवळ 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने 48 रन करताच इतिहासही रचला.


हार्दिक पांड्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी बॉलमध्ये 1000 धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. पांड्याने केदार जाधवला मागे सोडले आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी बॉलमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेलच्या नावावर आहे त्याने वनडेमध्ये 767 बॉलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या, तर हार्दिकने 857 बॉलमध्ये ही कामगिरी केली.


हार्दिक पांड्याआधी केदार जाधवने भारताकडून 937 बॉलमध्ये 1000 रन केले होते. तर सर्वात कमी इनिंगमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानच्या नावावर आहे, ज्याने 18 डावांमध्ये ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. दुसरा नंबर इमाम उल हकचा आहे.