IPL Retention 2024 : गुजरात टायटन्सला पहिल्याच सीझनमध्ये आयपीएल (IPL 2024) जिंकवणाऱ्या हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) गुजरातला (Gujarat Titans) रामराम ठोकत मुंबईच्या ताफ्यात एन्ट्री घेतली. हार्दिक पंड्या मुंबईच्या संघात परताच रोहितनंतर (Rohit Sharma) पलटणला नवा कर्णधार मिळालाय. ट्रेड विन्डोच्या माध्यमातून मुंबईने गुजरातचा सेनापती आपल्याकडे वळवला. कॅमरूनला संघात घेत आयसीबीने मुंबईला 'ग्रीन सिग्नल' दिला, त्यामुळे मुंबईला बाजी मारणं सोपं झालं. हार्दिकने बरोबर केलं की चुकीचं? असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर आणखी एक चर्चा होतीये की रविंद्र जडेजाची... 13 वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यावर नियमभंगाची कारवाई होऊन एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ते प्रकरण नेमकं काय होतं? जडेजावर खरंच अन्याय झाला होता का? असा सवाल आता विचारला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये रविंद्र जडेजाने भन्नाट कामगिरी केली होती. त्यामुळे जडेजाची निवड आयपीएलमध्ये करण्यात आली. राजस्थान रॉयल्सने जड्डूवर बोली लगावली. मात्र, त्यांनी दिलेलं मानधन त्याला मंजूर नव्हतं. त्याने मानधन वाढण्याची मागणी केली. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने साफ नकार दिला होता. त्यानंतर जडेजाने व्यक्तीगत पातळीवर मुंबई इंडियन्सशी चर्चा केली. 2010 च्या हंगामापूर्वी जडेजाने राजस्थानचा करार मान्य करण्यास नकार दिला. या सर्व गोष्टींमुळे आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर पडला आणि नियमांचा भंग केल्याने त्याच्यावर एका वर्षाच्या बंदीची कारवाई देखील करण्यात आली होती.


एका वर्षाच्या बंदीनंतर जड्डूला पुन्हा 2011 मध्ये संधी मिळाली. कोची टस्कर्सने जडेजाला आपल्या ताफ्यात घेतलं. पुढच्याच ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जडेजावर बोली लावली अन् जडेजा सीएसकेचा खास खेळाडू बनला. मागील हंगामात तब्बल 16 कोटी रुपयांच्या बदल्यात त्याने आयपीएल गाजवली होती. तुम्हाला माहित नसेल तर, जडेजा धोनीपेक्षा जास्त मानधन आयपीएल खेळण्यासाठी घेतो.


आणखी वाचा - Urvil Patel : गुजरातने दिला डच्चू, भावाचा इगो हर्ट... दुसऱ्याच दिवशी ठोकलं खणखणीत शतक; सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक!


हार्दिक पांड्याने मुंबईमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, हार्दिकचा हा व्यव्हार दोन संघांमध्ये झाला होता. तर जडेजाचा व्यव्हार हा वैयक्तिक पातळीवर झाला होता. ऑल कॅश डिलच्या माध्यमातून हा व्यवहार होणार होता. मात्र, कॅमरून ग्रीनची 17 कोटीची जागा रिकामी झाल्याने आता पांड्यासाठी रस्ता मोकळा झाला.


गुजरात टायटन्स


कायम ठेवलेले खेळाडू : अभिनव सदारंगनी, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा.


सोडलेले खेळाडू : अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, केएस भरत, ओडियन स्मिथ, प्रदीप सांगवान, शिवम मावी, उर्विल पटेल, यश दयाल.