Hardik Pandya: आज आयपीएलमध्ये दोन्ही पंड्या ( Pandya brothers ) ब्रदर्समध्ये सामना रंगला होता. या सामन्यात अखेर लहान भावाने बाजी मारली आणि गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) 56 रन्सने सामना जिंकला. या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने ( Lucknow Super Giants ) टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान फलंदाजी करताना आजच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याचं ( Hardik Pandya ) नशीब फार चांगलं असलेलं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सामन्यात गुजरातच्या दोन्ही ओपनर्सने चांगली फलंदाजी केली. वृद्धिमान सहा 81 तर शुभमन गिलने 94 रन्सवर नाबाद राहिला. यानंतर जेव्हा कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला तेव्हा तो आऊट होता होता अगदी थोडक्यासाठी वाचला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 


लखनऊ विरूद्धच्या सामन्याच हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी लखनऊकडून आवेश खान गोलंदाजी करत होता. यावेळी आवेशने टाकलेला एका बॉलवर हार्दिक शॉट मारू शकला नाही. मात्र यावेळी तो बॉल हार्दिकच्या शरीराला लागून स्टंपला लागला. मात्र बॉल इतक्या सौम्य पद्धतीने लागला की, बेल्स खाली पडल्या नाहीत. यावेळी हार्दिकचं नशीब चांगलं असल्याने तो नॉट आऊट राहिला. हा प्रकार पाहून हार्दिकला देखील हसू आलं. मात्र अखेरीस भावानेच भावाचा घात केल्याचं दिसलं. 



मोठ्या भावानेच केला घात!


या रूपाने हार्दिकला जणू एक प्रकारने जीवनदानच मिळालं. या सामन्यात हार्दिकने 15 बॉल्समध्ये 25 रन्सची खेळी केली. मात्र 16 व्या ओव्हरमध्ये हार्दिकने स्वतःची विकेट गमावली. यावेळी मोहसीन खान गोलंदाजी करत होता. यावेळी मोठा शॉट खेळण्याच्या नादात हार्दिक कॅच देऊन बसला. मुख्य म्हणजे हार्दिकचा हा कॅच दुसरा तिसरा कोणी नाही तर कृणाल पंड्यानेच पकडला.


पंड्या ब्रदर्स आमने सामने


लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने टीमची धुरा आता कृणाल पंड्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कृणाल पंड्या विरूद्ध हार्दिक पंड्या असं चित्र दिसून आलं. कधीकाळी हे दोन्ही भाऊ एकाच टीमकडून म्हणजेच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसायचे. मात्र आता हे दोघंही वेगळ्या फ्रेंचायझींकडून खेळत असल्याने दोघंही आमने-सामने खेळताना दिसले. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही भाऊ कर्णधार म्हणून आमनेसामने खेळताना दिसले.