Gujarat Titans released players list :  गुजरात टायटन्सने आपला कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघात कायम ठेवलं असून, त्याच्या मुंबई इंडियन्समध्ये परत येण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 24 नोव्हेंबर रोजी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) करार केला होता. त्यानंतर आता दोन दिवसातच 26 नोव्हेंबर रोजी हार्दिक पांड्याला गुजरातने (Gujarat Titans) रिटेन केलं आहे. त्यामुळे आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


गुजरात टायटन्सचा या खेळाडूंनी डच्चू (GT released players list)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यश दयाल, के.एस. भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासुन शनाका.



हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिलं आहे. तो त्याच्या जुन्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये परत येऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, आता तो गुजरात टायटन्सचा भाग असणार आहे. येत्या 12 डिसेंबरपर्यंत मुंबई इंडियन्ससाठी ट्रेडिंग विन्डो उघडी असणार असल्याने हार्दिकचं काय होणार? असा सवाल विचारला जात आहे.


आणखी वाचा - IPL 2024 : अनाकलनीय! RCB चा खळबळजनक निर्णय, 'या' तीन स्टार खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी


दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला. यामध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांचा फलंदाज देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी रुपये) आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा गोलंदाज आवेश खान (१० कोटी) यांची अदलाबदल केली. तर या आधी 3 नोव्हेंबर रोजी रोमारियो शेफर्ड लखनऊमधून मुंबई इंडियन्समध्ये गेला. तो यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.