नवी दिल्ली : टीम इंडियाचे खेळाडू मैदानात जेवढे धमाल करतात तेवढीच धमाल ते मैदानाबाहेरही करतात. अनेक खेळाडूंच्या वाढदिवसाचे धमाल मस्तीचे फोटो नेहमीच समोर येत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता नुकताच स्टार खेळाडू हार्दिक पंड्या याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या जल्लोषात अनेकांनी सहभाग घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे याच दिवशी आणखी दोन खेळाडूंचा वाढदिवस असल्याने हा जल्लोष दुप्पट जोमाने करण्यात आला. 



ऑलराऊंडर हार्दिक पंड्यासोबतच बॅटींग कोच संजय बांगड आणि टीमचा फिजिओ पॅट्रीक फरहार्ट याचाही वाढदिवस ११ ऑक्टोबरला होता. बांगडने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. त्यात तिघांच्याही चेह-यावर आणि शरिरावर केक माखलेला दिसतोय.