मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आणि हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्या लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.  २६ वर्षांच्या कृणाल पांड्याचं पंखुडी शर्मासोबत लग्न होत आहे. २७ डिसेंबरला मुंबईमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. पंखुडी आणि कृणाल गेली दीड वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आता ते लग्न करणार आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कुठे होणार विवाहसोहळा 


कृणाल आणि पंखुडीचे लग्न सांताक्रुझ येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. तेथेच रिसेप्शन सोहळाही पार पडेल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल, अशी माहिती कृणालने टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे. कृणाल दुखापतग्रस्त असल्याने तो सध्या रणजीपासून दूर आहे. 



खास लव्ह  स्टोरी


आयपीएलच्या दहाव्या हंगामात पंखुडीला कृणालने प्रपोज केले होते. या सामन्यात कृणालला मॅन ऑफ द मॅच म्हणूनदेखील घोषित केले होते.   त्यामुळे या संधीचा फायदा उठवत त्याने पंखुडीला प्रपोज केले. 



आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा विजय झाला होता. त्यानंतर आयपीएलच्या ट्रॉफी हातात घेऊन पंखुडी दिसली होती. तेव्हापासूनच पंखुडी चर्चेत आली होती. हातात ट्रॉफी असल्याचे पंखुडीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते. यानंतर कृणालनं पंखुडी त्याची गर्लफ्रेंड असल्याचं सांगून स्पष्टीकरण दिलं होतं. तसंच योग्यवेळी आम्ही लग्न करू, असंही कृणाल म्हणाला होता.