नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्याने न्यूझीलंड विरूद्ध टी-२० सामन्यात तसा तर बॅटने काही करिश्मा केला नाही. पण त्याने बॉलिंग आणि फिल्डींगच्या माध्यमातून कमाल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने या सामन्यात सर्वात शानदार कॅच घेतली आहे. त्याने इतकी जबरदस्त कॅच घेतली की, कॉमेंट्री बॉक्समध्ये कमेंटेटरने म्हणाले ही या वर्षातील बेस्ट कॅच आहे.  


पहिल्यांदा बॅंटीग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर २०२ रन्सचे लक्ष्य दिले होते. आशिष नेहराचा हा शेवटचा सामना असल्याने सर्वांच्या नजरा टीम इंडियाकडे होत्या. आशिष नेहराने पहिला ओव्हर टाकल आणि त्याने केवळ ५ रन्स दिले. 


दुसरा ओव्हर कोहली युजवेंद्र चहलला दिला. युजवेंद्र चहलच्या दुस-याच बॉलवर न्यूझीलंडचा सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल एक शॉट मारला. सर्वांना वाटलं हा सिक्सर असेल पण हार्दिक पंड्याने विजेच्या वेगाने डाय टाकत कॅच घेतली. खरंतर ही कॅच अशक्य होती पण पंड्याने कमाल दाखवली. 



हार्दिक पंड्याने ही अशक्य कॅच घेतल्यानंतर विकेटच्या मागे उभा असलेल्या धोनीचं तोंड उघडच राहिलं.