Ind Vs Nz : न्यूझीलंडविरूद्धची (Ind Vs Nz) तिसरा टी-20 सामना आज अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव आणि दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर 3 सामन्यांच्या या सिरीजमध्ये टीम इंडियासाठी (Team India) आजचा सामना खूप महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. हा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सामन्यात चाहत्यांची नजर प्लेईंग 11 वर असणार आहे. टीम इंडियाची ओपनिंग जोडी शुभमन गिल (Shubman gill) आणि ईशान किशन (Ishan kishan) ही फ्लॉप झालेली दिसली. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये पृथ्वी शॉला (Prithvi shaw) संधी मिळण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉचा खेळ चांगला झाला, त्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली


हार्दिक पंड्या करणार का प्लेईंग 11 मध्ये बदल


हार्दिक पंड्या आजच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 मध्ये बदल करू शकतो. तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 साठी हार्दिक खराब फॉर्ममध्ये असलेल्या ईशान किंवा शुभमनला टीमबाहेर बसवण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णायक टी-20 मध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलू शकते. 


अर्शदीप सिंहबाबत कर्णधार घेणार निर्णय?


टीम इंडियासाठी अर्शदीप सिंह एक मोठं आव्हान आहे. कारण गेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने चांगला खेळ केला नसून गोलंदाजीच्या बाबतीत तो फार महागडा ठरला आहे. अर्शदीपने सिरीजच्या 2 सामन्यांमध्ये 58 रन्स दिले आहे. यावेळी 9.66 च्या इकोनॉमीने रन्स दिलेत.


तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11


शुभमन गिल, पृथ्वी शॉ/ईशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, शिवम मावी, अर्शदीप सिंह


न्यूझीलंड ची प्लेइंग-11


फिन एलेन, डिवॉन कॉन्वे, मार्क चैपमैन, ग्लेन फिलिप्स, डिरेल मिचेल, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, जॅकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेयर टिकनर


भारत-न्यूझीलंड टी-20 सीरिज


  • पहिली टी-20: न्यूझीलंडचा 21 रन्सने विजय 

  • दूसरी टी-20: भारताचा 7 विकेट्सने विजय

  • तीसरा टी-20: 1 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता