अर्जुन तेंडुलकर 'मुंबई' सोडणार? 2022 मध्ये 'गुजरात'ने दाखवलेला इन्ट्रेस्ट; अखेर MI ने मोजलेली 'इतकी' रक्कम
इंडियन प्रीमिअर लीग या जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनचं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या अनेक जुन्या आणि नव्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला रिलीज केलं आहे. त्यामुळे मुंबईचा मेंटॉर असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन याला आपल्या संघात घेण्यासाठी कोणता संघ इन्ट्रेस्ट दाखवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
1/6
2/6
आयपीएल 2022 मिनी ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरने प्रथमच स्वतःला रजिस्टर केलं होतं. त्याने 20 लाखांच्या बेस प्राईजवर स्वतःला रजिस्टर केलं होतं. ऑलराउंडरच्या कॅटेगरीमध्ये अर्जुन ऑक्शन टेबलवर आला तेव्हा त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करण्यासाठी पहिली बोली लावली. त्याचवेळी गुजरात टायटन्सने देखील अर्जुनला आपल्या संघात घेण्यासाठी इन्ट्रेस्ट दाखवला.
3/6
4/6
अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. 2023 मध्ये अर्जुनचे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले. तर अर्जुनने शेवटचा सामना हा आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळला. अर्जुनने आतापर्यंत एकूण 3 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना 13 धावा केल्या.
5/6
6/6