Hardik Pandya ICC T20 Rankings: भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्यांच्या मालिकेदरम्यान आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली. या यादीत भारतीय टीमचा खेळाडू हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. आता बांगलादेशविरुद्ध अजून दोन सामने बाकी आहेत आणि सामन्यात हार्दिकने चांगली खेळ केला तर तो जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. सध्या या यादीत फक्त आता त्याच्या पुढे  दोनच खेळाडू आहेत.


कोण आहे पहिल्या क्रमांकावर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन T20 क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टन हा खेळाडू पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी आहे. भारताच्या हार्दिक पंड्याने सलग चार स्थानांनी झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे सध्याचे रेटिंग 216 आहे. याआधीही तो पहिल्या क्रमांकावर होता, मात्र त्यानंतर तो खाली गेला होता. आता पुन्हा त्याने मोठी झेप घेतली आहे.


हार्दिक पंड्या पुढे गेल्याने 'या' खेळाडूंचे नुकसान 


यादीत हार्दिक पंड्याच्या पुढे जाण्याने अनेक खेळाडूंचे नुकसान झाले आहे. मार्कस स्टॉइनिस आता एक स्थान गमावून 211 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या मागोमाग झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा. वानिंदू हसरंगा आणि अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचीही घसरण झाली आहे. याशिवाय टॉप रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.


हार्दिकने ग्वाल्हेरमध्ये दाखवला उत्तम खेळ 


ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने त्या सामन्यात चार षटके आणि 26 धावा देऊन एक बळी घेतला. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने केवळ 16 चेंडूत 39 धावा केल्या. यामध्ये त्याने पाच चौकार आणि दोन षटकार आले आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. या केलीच फायदा त्याला यावेळी रँकिंगमध्ये मिळाला आहे.