Hardik Pandya: अतिशहाणपणा की माज? भर मैदानात हार्दिकने सूर्यासोबत केलेला उद्धटपणा पाहून तुम्हीही संतापाल
Hardik Pandya: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे हार्दिकची वागणूक. सामना सुरु असताना हार्दिकने सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) अशी वागणूक दिली की, तुम्हालाही राग अनावर होईल.
Hardik Pandya: उत्तम खेळाच्या जोरावर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कप 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 41 रन्सने विजय मिळवला आणि फायनलचं तिकीट गाठलं. या सामन्यात टीम इंडियाच्या ( Team India ) फलंदाजांना काही चांगला खेळ करता आला नाही, मात्र गोलंदाजी उत्तम खेळ करत सामना विजयाच्या वाटेवर आणला. दरम्यान या सामन्यात अशी एक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ( Social Media ) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
एशिया कपमध्ये उपकर्णधाराची धुरा हार्दिक पंड्याच्या ( Hardik Pandya ) खांद्यावर देण्यात आली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे हार्दिकची वागणूक. सामना सुरु असताना हार्दिकने सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) अशी वागणूक दिली की, तुम्हालाही राग अनावर होईल.
Hardik Pandya चा व्हिडीओ होतोय व्हायरल
या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी जेव्हा श्रीलंकेची टीम फलंदाजी करत होती, तेव्हा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) गोलंदाजीला आला. या सामन्यात हार्दिकने उत्तम गोलंदाजी केली. 40 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने महेश तीक्षणाला कॅच आऊट केलं. यावेळी पर्यायी फिल्डर म्हणून आलाले सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) हा कॅच घेतला. कॅचनंतर विराट कोहली, रवींद्र जड़ेजा, रोहित शर्मा या सर्व खेळांडूनी त्याला शाबासकी दिली, मात्र हार्दिकने शाबासकी तर सोडा साधा हात देखील मिळवला नाही.
विकेट गेल्यानंतर सूर्या हार्दिकशी हात मिळवला गेला. यावेळी सूर्याने हार्दिकजवळ हात पुढे केला, त्यावेळी हार्दिकनेही हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. मात्र सूर्याकडे पाहताच हार्दिकने लगेच हात मागे खेचला. यावेळी सूर्यकुमार यादवचा चेहराही पाहण्यासारखा होता. दरम्यान हे सर्व दृश्य कॅमेरात कैद झालं असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी हार्दिकचं हे वागणं चाहत्यांना अजिबात पटलेलं नाहीये.
बेस्ट कॅच घेतल्याबद्दल सूर्याला खास अवॉर्ड
एशिया कप स्पर्धेत आतापर्यंत सूर्यकुमार यादवला ( Suryakumar yadav ) टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये संधी मिळालेली नाही. दरम्यान त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये पुरस्कार देण्यात आला. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात जेव्हा टीम इंडिया फिल्डींगसाठी मैदानात उतरली तेव्हा सूर्यकुमार यादवने ( Suryakumar yadav ) पर्यायी फिल्डरची भूमिका बजावली. सामन्यामध्ये सूर्यकुमारने ( Suryakumar yadav ) 2 उत्तम कॅच घेतले. यावेळी प्लेईंग 11 चा भाग नसूनही सूर्याला बेस्ट कॅच पकडल्याचा अवॉर्ड देण्यात आला.