एशियन गेम्समध्ये देशाला मेडल जिंकून देणारा खेळाडू विकतोय चहा
जगभरात ओळख मिळाली पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला चहा विकावा लागतोय.
मुंबई : गरीबी उंबरठ्यावर येते तेव्हा पोट भरण्यासाठी अनेकांना आपली स्वप्न अर्धवट सोडून परिस्थीतीपुढे गुडघे टेकावे लागतात. अशाच परिस्थितीशी झगडत जे पुढे जातात ते इतिहास बनवतात. देशाला सेपक ताकरामध्ये पहिले ऐतिहासिक पदक जिंकणारा हरीश कुमार हा अशांपैकीच एक आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. त्याला जगभरात ओळख मिळाली पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला चहा विकावा लागतोय.
'चांगली नोकरी हवी'
माझा परिवार खूप मोठा असून कमाईची साधनं फारच कमी आहेत. परिवाराला साथ देण्यासाठी मी वडीलांसोबत चहा विकतो असे हरिश सांगतो. त्यानंतर दुपारी 2 ते 6 वाजल्यानंतर तो खेळाची प्रॅक्टीस करतो. परिवाराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी चांगली नोकरी करायची इच्छाही तो व्यक्त करतो.
कोचची मदत
2011 साली त्याने सेपक ताकरा खेळायला सुरुवात केली. कोच हेमराजने त्याला खेळताना पाहील आणि स्पोर्ट्स अथोरीटी ऑफ इंडियामध्ये घेऊन गेले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला किट आणि फंड मिळू लागला. देशाला जास्त मेडल मिळवून देण्यासाठी मी अधिक प्रॅक्टिस करत असल्याचेही तो सांगतो.
बापबेटे विकतात चहा
आम्ही खूप संघर्ष करत हरिशला लहानाचं मोठं केलंय. हरिशचे बाबा ऑटो ड्रायव्हर आहेत. सोबत आमचं चहाचं दुकानंही आहे. जिथे बापबेटे मिळून काम करतात असे हरिशच्या आईने सांगतले. कोच हेमराजने हरिशला खूप मदत केल्याचेही ती सांगते.