मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीम आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला. मुख्य म्हणजे या सामन्यात पावसाने सर्व खेळ विस्कळीत केला. ज्यामुळे सामन्याचं लक्ष्य डकवर्थ लुईस यां नियमांतर्गत निश्चित केलं गेलं. टीम इंडियाने हा सामना गमावला खरा मात्र सामन्यादरम्यान भारताच्या हरलिन देओलने सर्वांची मनं जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या डावातील 19व्या षटकातील 5व्या बॉलवर हरलीन देओल बाउंड्री लाइनवर होती. इंग्लंडची अ‍ॅमी जोन्स फलंदाजी करत असताना, तिने शिखा पांडेचा बॉलवर जोरदार शॉट मारला. चौकार जाणारा हा बॉलचा हरलीनने अद्भूतरित्या कॅच घेतला. यामुळे जोन्सला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. हरलीनने ज्या प्रकारे फिल्डींग केली ती आश्चर्यकारक होती.



शॉट मारल्यावर प्रथम हरलीनने तो पकडण्यासाठी हवेत उडी घेतली. मात्र ती बाऊंड्री लाईनच्या जवळ असल्याने तिन हातातील बॉल बाऊंड्री लाईनच्या आत उडवला आणि तिने बाऊंड्रीच्या बाहेर उडी मारली. त्यानंतर क्षणार्धात पुन्हा बाऊंड्री लाईनच्या आत येईन हवेत उडवलेला बॉल पकडत जोन्सला माघारी घाडलं.


हरलीनचा हा कॅच पाहून प्रत्येकजण हैराण झाले. हरलीनच्या या कॅचचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. या कॅचमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.