नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हिचा राष्ट्रीय खेळ दिनाच्या दिवशीच 'अर्जुन पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार मला मिळेल, असा कधी विचारही केला नव्हता, अशा शब्दांत हरमनप्रीतनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अशा पुरस्कारामुळे नक्कीच आत्मविश्वास वाढतो, असंही तिनं म्हटलंय. हरमनप्रीतसोबत इतर १६ खेळाडुंना अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. 



राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होण्याची परवानगी न मिळालेल्या तिच्या कुटुंबीयांनी हा सोहळा टीव्हीवरच पाहिल्याचं सांगितलं. 


हरमनप्रीतनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी खेळली होती. भारतात लवकरच महिला आयपीएल सुरू होईल, अशी आशा तिनं आता पुन्हा एकदा व्यक्त केलीय.