Mumbai Indians चा मोठा निर्णय; टीमच्या कर्णधारपदी `या` खेळाडूची नियुक्ती
मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळणार आहे. गुजरात जाएंट्सशी मुंबईचा पहिला सामना रंगणार आहे. येत्या शनिवारपासून म्हणजेच 4 मार्चपासून वुमेंस प्रिमीयर लीगला सुरुवात होणार आहे.
WPL 2023 Mumbai Indians: आयपीएलप्रमाणे आता वुमेंस प्रीमियर लीगला (Women’s Premier League) देखील लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या 4 मार्चपासून या लीगला सुरुवात होणार असून क्रिकेट चाहते मात्र फार उत्सुक आहेत. अशातच सर्वात लोकप्रिय टीम मुंबई इंडियन्सने त्यांच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. या टीमची कर्णधार दुसरी तिसरी कोणीही नसून टीम इंडियाची कर्णधार हरनमप्रीत कौर आहे. मुंबई इंडियन्सच्या महिलांच्या टीमची धुरा हरमनप्रीतच्या हाती सोपवली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने ट्विटरवरून हरमनचं खास पोस्टर देखील जाहीर केलं आहे.
गुजरात जाएंट्सशी होणार पहिला सामना
मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळणार आहे. गुजरात जाएंट्सशी मुंबईचा पहिला सामना रंगणार आहे. यावेळी कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीतकडे देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सच्या टीमने 33 वर्षांच्या हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) कडे टीमची कमान सोपवली आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाची देखील कर्णधार आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये Harry is magi(C) असं लिहिण्यात आलंय. हॅरी पॉटर सिनेमाप्रमाणे हरमप्रीतच्या हातात देखील जादूची कांडी या पोस्टरमध्ये दाखवण्यात आली आहे.
13 फेब्रुवारी रोजी वुमेंस प्रीमियर लीगसाठी महिला खेळाडूंचं ऑक्शन घेण्यात आलं होतं. या ऑक्शनमध्ये मुंबईच्या फ्रेंचायझीने Harmanpreet Kaur ला 1.80 कोटी रूपये खर्च करून आपल्या ताफ्यात घेतलं. हरमनची बेस प्राईस 50 लाख रूपये होती. मुख्य म्हणजे टीम इंडियाचे दोन्ही कर्णधार (पुरुष आणि महिला) या दोघांचेही कर्णधार मुंबईच्या ताफ्यात आहेत.