नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटसमन हरमनप्रीत कौर हिनं 'आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७'च्या सेमीफायनलमध्ये १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी खेळत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण, याच खेळाबद्दल हरमनप्रीतनं आता एक नवा खुलासा केलाय... तो ऐकून तुम्हीही म्हणाल... ब्राव्हो!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरमनप्रीतनं केलेल्या खुलाशानुसरा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात तिनं खेळलेली खेळी केवळ एका हाताच्या जोरावर खेळली होती... कारण तिच्या दुसऱ्या हाताला दुखापत झाली होती... दुसऱ्या हाताचं एक बोट गंभीररित्या दुखावलं होतं... फिजिओंनी अनेक प्रयत्न करत हरमनप्रीतचं ते बोट क्लॅप लावून सरळ ठेवलं होतं.


टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत संपूर्ण टूर्नामेंट दरम्यान आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या बाजुच्या बोटाला जखम झाली होती. फिजिओनं दिलेला आरामाचा सल्ला बाजुला सारून हरमननं फायनलपर्यंत खेळण्याचा आपला निर्धार कायम ठेवला... आणि धडाकेबाज खेळीही करून दाखवली.


केवळ एका हातानं शॉटस लावल्यामुळे हरमनप्रीतला आपल्या खांद्यावर जास्त जोर टाकावा लागला होता. ज्यामुळे हरमनला फायनलमध्ये खेळताना अधिक त्रास सहन करावा लागला. 


सेमीफायनलच्या मॅचमध्ये हरमनप्रीतनं ११५ बॉल्समध्ये १७१ रन्स ठोकले होते. हरमनप्रीत कौरच्या या धडाकेदार खेळीमुळे भारताला या मॅचमध्ये विजय मिळवणं शक्य झालं होतं.