Harmanpreet Kaur suspended by ICC : भारतीय महिला टीम विरूद्ध बांग्लादेश ( BAN W vs IND W ) यांच्यातील सिरीज अखेर बरोबरीत सुटली. यावेळी शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना फार वादग्रस्त ठरल्याचा दिसून आलं. या वादाचा केंद्रबिंदू ठरली ती टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ). दरम्यान हरमनप्रीतच्या या वागणूकीमुळे तिच्यावर आयसीसीकडून (ICC) दंड ठोठावण्यात आलाय. 


कोणती कारवाई झाली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरमनप्रीत कौरला आयसीसीच्या आचारसंहितेचे 2 वेगवेगळे उल्लंघन केल्यामुळे पुढील 2 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. भारताच्या डावाच्या 34 व्या ओव्हरमध्ये  स्पिनर नाहिदा अक्‍टरला स्लिपमध्ये कॅटआऊट केल्‍यावर कौरने तिच्या बॅटने विकेट मारून बाद झाल्यानंतर निराशा व्‍यक्‍त केली होती. लेव्हल 2 च्या गुन्ह्यासाठी कौरला तिच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि तिच्या शिस्तभंगावर 3 डिमेरिट गुण मिळाले आहेत



खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.8 चं उल्लंघन केल्याबद्दल हरमनप्रीत कौर दोषी आढळल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. अंपायरच्या निर्णयावर असहमत दर्शवण्याने आयसीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या एका घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका केल्यामुळे देखील आयसीसीने नापंसती दर्शवली. त्यामुळे संबंधित लेव्हल 1 गुन्ह्यासाठी तिच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे.


आणखी वाचा - Harmanpreet Kaur Contro: ही पहिली वेळ नाहीच... जेव्हा फेक डिग्रीमुळे गेलं DSP पद!


दरम्यान, टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने गुन्हाची कबुली दिली आहे. अंपायर अख्तर अहमद यांनी प्रस्तावित केलेल्या निर्बंधांना सहमती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, औपचारिक सुनावणीची गरज उरली नाही आणि दंडाची अंमलबजावणी तातडीने झाल्याची माहिती आयसीसीने त्यांच्या ऑफिशियल अकांऊंटवरून दिली आहे.