Harry Brook: इंग्लंडला मिळाला नव्या दमाचा `विनोद कांबळी`, पठ्ठ्यानं World record मोडलाय!
Harry Brook, england vs pakistan: स्टार खेळाडू हॅरी ब्रूकने फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून हॅरीने पाकिस्तानची नाचक्की केलीये.
Harry Brook: गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडच्या संघात मोठे बदल झाल्याचं दिसतंय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T-20 World Cup) जिंकल्यानंतर इंग्लंडचा आत्मविश्वास गगनात मावेना झाला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंकडून अविश्वसनीय कामगिरी झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच इंग्लंडच्या नव्या दमाच्या हॅरी ब्रुकने (Harry Brook) धडाकेबाज कामगिरी केली आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड (england vs pakistan) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विल्मिंग्टन येथे खेळला जात आहे. त्यावेळी ब्रुकने नावाला साजेशी कामगिरी केली आहे.
हॅरी ब्रुकने रचला इतिहास
हॅरी ब्रूकने आपल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून हॅरीने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. विशेष गोष्ट म्हणजे ब्रूकने 9 डावात चार शतके लगावली आहेत. त्यामुळे त्याने नवा विश्वविक्रम (Harry Brook break vinod kambli 30 year old record) नावावर केला आहे.
आणखी वाचा - 13.25 कोटींच्या Harry Brook ची टी-20 लीगमधून अखेर माघार; वाचा नेमकं कारण काय?
Vinod Kambli चा रेकॉर्ड मोडला
हॅरी ब्रूकने भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीचा (Vinod Kambli) वर्षानुवर्षे जुना विक्रम मोडीत काढलाय. 9 कसोटी डावांत 800 हून अधिक धावा करत त्याने अशाप्रकारे विक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विनोद कांबळीने 9 डावात 100 च्या सरासरीने 798 धावा केल्या होत्या. त्यात विनोद कांबळीने 4 सेंच्यूरी तर 1 हाफ सेंच्युरी झळकावली होती.
Harry Brook वर IPL मध्ये 13.25 कोटींची बोली
दरम्यानस, इंग्लंड क्रिकेट टीमचा (England Cricket Team) धडाकेबाज खेळाडू हॅरी ब्रूक (Harry Brook) याला आयपीएल 2023 (IPL 2023) च्या मिनी ऑक्शनमध्ये 13.25 कोटी रूपयांना सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) खरेदी केली. त्यामुळे आता हैदराबादचा कॅप्टन मार्करमचं टेन्शन संपलं आहे.