NZ VS ENG : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. यांच्यातील पहिला सामना हा क्राइस्टचर्चच्या हेगले ओवलवर खेळवण्यात येत असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक याने दमदार शतक ठोकलं. हे शतक ब्रुकचे टेस्ट क्रिकेटमधील सातवं शतक होतं. ब्रुकने हे शतक 123 बॉलमध्ये पूर्ण केलं असून हे शतक ठोकताच हॅरी ब्रुकने (Harry Brook)  रेकॉर्ड केला असून टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लक्षात घेऊन इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिज  ही अत्यंत महतवाची आहे. न्यूझीलंडमध्ये इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यात 28 ते 2 डिसेंबर पर्यंत पहिला टेस्ट सामना होणार आहे. यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट्स गमावून 348 धावा केल्या. मग इंग्लंडचा संघ ही आघाडी मोडण्यासाठी मैदानात आला . यावेळी संकटात असलेल्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रुक हा संकटमोचक ठरला. 


हॅरी ब्रूकची विस्फोटक खेळी : 


हॅरी ब्रूक हा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. ब्रूकने केवळ 2300 चेंडूंचा सामना करत ही कामगिरी केली. ब्रूकपूर्वी इंग्लंड बेन डकेट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 2293 चेंडूत सर्वात जलद 2000 धावा करण्याचा रेकॉर्ड बेन डकेटच्या नावावर आहे. याशिवाय टीम साऊदी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ॲडम गिलख्रिस्ट चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध टेस्टचा दुसरा दिवस संपेपर्यंत हॅरीने 163 बॉलमध्ये 132 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तर दुसरा दिवस संपेपर्यंत इंग्लंडने 5 विकेट्स गमावून 319 धावा केल्या आहेत. 


दिल्लीने मोजले 6.25 कोटी : 


आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. यात 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये आलेल्या इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटींना विकेट घेतले. 


न्यूझीलंड (प्लेईंग 11) :


टॉम लॅथम (कर्णधार), डेवोन कॉनवे, केन विलियमसन, रचिन रवींद्र, डेरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नाथन स्मिथ, टिम साउथी, मैट हेनरी, विलियम ओरोर्के


इंग्लंड (प्लेईंग 11 ) :


जॅक क्रॉली, बेन डकेट, जॅकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक, ओली पोप (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर