मुंबई: दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात हरियाणाच्या कुस्तीपटूची हत्या झाली आणि त्यानंतर सुशील कुमार अद्यापही फरार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सुशील कुमारचा शोध सुरू आहे. तर आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी भुरा कुस्तीपटूने सुशील कुमारसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुस्तीपटू सागर धनखड हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आणखी काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सुशील कुमार अद्यापही फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. भुरा कुस्तीपटूची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


मुख्य आरोपी सुशील कुमारने भुराला भांडण झाल्याचं कळवलं. त्यावेळी भुरा घटनास्थळी पोहोचला तेव्हा सागरचा आधीच मृत्यू झाला होता. त्यानंतर हरिद्वारला सोडण्यास भुराला सांगण्यात आलं. पोलिसांनी आरोपींकडून चार कार आणि काही सामान ताब्यात घेतलं आहे. 


पोलिसांनी छत्रसाल स्टेडियम बाहेरून 4 मे रोजी 2 कार आणि काडतूस, बंदूक ताब्यात घेतली. सुशील विरोधात आऊटलूक नोटीस जारी करण्यात आली आहे. पुढील तपास हरिद्वारला जाऊन करणार आहेत तिथे पोलिसांना सुशीलचं शेवटचं लोकेशन मिळालं होतं. 


नेमकं काय आहे प्रकरण? 


दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यामध्ये 23 वर्षाचा कुस्तीपटू सागरचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सुशील कुमार घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्या घरावर पोलिसांनी देखील छापा टाकला होता.