कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता दु:ख व्यक्त करुन फायदा नाही. झालेल्या चुका भविष्यात सुधारल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पराभवानंतर आपले दु:ख लपवणे किती कठीण होते असे शाकीबला विचारले असता तो म्हणाला, खरं सागांयचे तर पराभवाबद्दल आता खेद व्यक्त करुन काही उपयोग नाही. अशा वेळी भावनांवर कंट्रोल करणे कठीण असते मात्र ते करावे लागते. 


भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या तडाखेबंद २९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला बांगलादेशवर चार विकेट राखून विजय मिळवता आला. 


शाकीब पुढे म्हणाला, घड्याळाचे काटे काही फिरवता येणार नाही. यासाठी भविष्यात चांगले करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आम्ही असे अनेक सामने गमावले. हा आमचा पाचवा अंतिम सामना होता जो आम्ही गमावला. आशिया कप आणि निदहास ट्रॉफीची फायनल आम्ही गमावली. विजय जवळ असताना आम्ही हे सामने गमावले. 


निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला शेवटच्या चेंडूत जिंकण्यासाठी ५ धावा हव्या होत्या. सौम्या सरकार गोलंदाजी करत होता. त्याच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार खेचला आणि मैदानात एकच जल्लोष सुरु झाला.