नवी दिल्ली : मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. दररोज दोन्ही बाजूंनी एकमेकांवर नवनवे आरोप प्रत्यारोप केले जातायत. आता शमीची पत्नी हसीन जहांने शमीवर नवा आरोप केलाय. लंडनचे बिझनेसमन मोहम्मद भाई शमीला नव्या नव्या मुलींना भेट घडवून द्यायचे. त्यातूनच शमीचे मंजू मिश्रा नावाच्या एका मुलीसोबत शमीचे नाते होते. हसीन जहांने हे आरोप करतानाच आणखी एक फेसबुक चॅट पोस्ट केलंय. हे तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलंय. हसीनने मंजू मिश्राशी शमीचे संबंध असल्याचा आरोप केलाय. दरम्यान झी न्यूज या आरोपांची तसेच फेसबुकची पुष्टी करत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हसीन जहांने फेसबुक पोस्टमध्ये आरोप करताना म्हटलंय मंजू मिश्रा नावाची महिला नागपूरमध्ये राहते. तिच्याबद्दल कोणाला अधिक माहिती आहे का?


तिसऱ्या व्यक्तीवर शमीचा आरोप


याआधी हसीन जहांने केलेल्या आरोपांवर शमी म्हणाला होता की, तिसऱा व्यक्ती घर उद्धवस्त करतोय आणि तीच व्यक्ती हसीनचे कान भरतेय. जे सिद्ध करायचे आहे ते हसीन जहांने करायचे कारण आरोप तिने लावलेत.



शमी म्हणाला, हसीनचे आरोप बिनबुडाचे आहेत आणि कोणी तिसरा व्यक्ती तिचे घर उद्धवस्त करतोय. मी आताही म्हणतोय,हे हसीनचे काम नाही. हे कोणीतरी तिसरी व्यक्ती करतेय. माझ्या कुटुंबातील सुख कोणाला पाहावलं गेल नाही.