India vs Srilanka 3rd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने यजमानांना क्लिन स्विप दिला. टीम इंडियाने श्रीलंकेचा अटीतटीच्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये 5 बॉल राखून विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास वाढला आहे. अशातच आगामी वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाचे खेळाडू तयार देखील झालेत. अशातच आता हेड कोच गौतम गंभीरने (Head Coach Gautam Gambhir) खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये महत्त्वाचा सल्ला दिला. 


गौतम गंभीर काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या सामन्यात सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. सूर्यकुमार यादवने देखील उत्तम कॅप्टन्सी केली. तुम्ही लढत राहिला तर तुम्ही हरू शकत नाही. आजचा सामना याचच उदाहरण आहे. आपल्या अशी परिस्थिती मोठ्या सामन्यात देखील उद्भवू शकते. त्यामुळे आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करता यायला हवा. आपण यातून शिकवण घ्यायला हवी आणि पुढचा प्रवास करायला हवा, असंही गौतम गंभीर म्हणतो.


आणखी वाचा - 'कॅप्टन म्हणून तू फक्त...', ड्रेसिंग रुममध्ये सर्वांसमोर हार्दिक पांड्या सूर्याला असं काय बोलला? Video व्हायरल 


काही खेळाडू जे वनडे फॉर्मेटचा भाग नसतील त्यांना जास्त विश्रांती मिळेल, त्यामुळे तुम्ही बांगलादेश मालिकेसाठी परत येताना याची खात्री करा, तुमचं कौशल्य आणि फिटनेस पातळी उच्च ठेवा. कसोटी मालिकेसाठी विचार करा, ठीक आहे, मी फक्त वर उचलू शकतो आणि कदाचित संघासाठी पाठवू शकतो. त्यामुळे फिटनेसची लेवल योग्य आहे याची खात्री करा, असा सल्ला गौतम गंभीरने खेळाडूंना दिला आहे. 



श्रीलंकेचा वनडे संघ - चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसंका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, कमिंदू मेंडिस, जनिथ लियानागे, निशान, वनिंदू हसरंगा, दुमिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथिशा पथिराणा, असिथा फर्नांडो.


भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (विकेटकीपर), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग , अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.