ICC कडून या माजी कर्णधारावर 8 वर्षांची बंदी
आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने 8 वर्षाची बंदी
मुंबई : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकवर आयसीसीने 8 वर्ष सर्व प्रकारच्या क्रिकेटवर बंदी घातली आहे. अंतर्गत माहिती जाहीर करणे आणि आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन करण्याचा आरोप त्याच्यावर होता. (ICC Anti Corruption Code)
झिम्बाब्वेचा सर्वात जलद गोलंदाजांपैकी एक असणारा हीथ स्ट्रीक (Heath Streak) यांची 2017 आणि 2018 दरम्यानच्या सामन्यांची चौकशी सुरू होती.
आयसीसीची अधिकारी एलेक्स मार्शल (Alex Marshall) यांनी म्हटलं की, 'हीथ स्ट्रीक अनुभवी खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचे कोच होते. भ्रष्टाचार विरोधी शिक्षा सेशनमध्ये त्यांचा सहभाग होता.
एलेक्स मार्शल यांनी म्हटल की, माजी कोच यांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं. ज्यामध्ये 4 खेळाडूंना मदत करण्याचा आरोप देखील आहे. या दरम्यान चौकशीत अडथळे आणणे आणि चौकशीत उशीर करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला.