WTC Final : पाचव्या दिवशी सामन्यावर पावसाचं सावट; ICC च्या नियमांनुसार `ही` टीम जिंकणार फायनल!
WTC Final : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रंगलाय. सामन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी इंग्लंडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशावेळी आयसीसी ( ICC ) च्या नियमांनुसार कोणती टीम विजयी होणार हे पाहावं लागणार आहे.
WTC Final : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रंगलाय. आज या सामन्याचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत दोन्ही टीमच्या खेळाडूंना चांगला खेळ दाखवलाय. एकंदरीत या फायनल सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिसून येतेय. तर दुसरीकडे सामन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी इंग्लंडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशावेळी आयसीसी ( ICC ) च्या नियमांनुसार कोणती टीम विजयी होणार हे पाहावं लागणार आहे.
टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी फायदेशीर ठरल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 10 विकेट्स गमावून 469 रन्स केले होते. यावेळी टीम इंडियाने ( Team India ) फलंदाजीला उतरून केवळ 269 रन्सचा आकडा गाठला.
पहिल्या डावात कांगारूंना 123 रन्सची आघाडी मिळाली. अशावेळी या सामन्यावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून येतंय मात्र कांगारूंसाठी सामन्याच्या पाचव्या दिवशी एक वाईट बातमी समोर आली आहे.
फायनल सामन्यात पाऊस ठरणार का विलन?
वेदर फोरकास्टिंगने दिलेल्या माहितीनुसार, या सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचं सावट दिसून येतंय. रविवारी याठिकाणी पाऊस येण्याची 80 टक्के शक्यता वर्तवण्यात येतेय.
AccuWeather.com या वेबसाईटच्या माहितीनुसार, 11 जून रोजी 88 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अशा परिस्थितीसाठी 12 जून हा रिझर्व डे म्हणून ठेवलाय. मात्र रिझर्व डे म्हणजेच 12 तारखेला देखील 88 टक्के पाऊस अपेक्षित आहे.
जर या सामन्यात पावसाने खो घातला तर हा सामना रद्द केला जाऊ शकतो. परिणामी भारताचा पराभव टाळता येऊ शकतो.
जर पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, विजेता ठरवण्यात येईल. जर सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन्ही टीम्स ट्रॉफीवर कब्जा करतील. परिणामी ऑस्ट्रेलिया आणि भारत हे संयुक्त विजेते असू शकतात.