Sport News :  यंदाच्या IPl आधी लिलावामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे. (IPL Auction 2023) कारण संघानी काही मोठे खेळाडू रिलीज केले आहेत. हे खेळाडू असे आहेत की त्यांच्यामध्ये संपूर्ण सामना पालटवून देण्याची हिम्मत आहे. आताच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील स्टार खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लिलावामध्ये या खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा लावला जाण्याची शक्यता आहे. असे 5 खेळाडू आहेत ज्यांच्यावर मोठी रक्कम लावली जाऊ शकते. (highest amount that an IPL franchise will pay on these 5 players ipl auction 2023 latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसला हैदराबादने आपल्या ताफ्यातून रिलीज केलं आहे. हैदराबाद संघाला आयपीएलची ट्रॉफी केनच्या नेतृत्त्वात मिळाली होती. केनसारख्या मोठ्या खेळाडूला संघात घेण्यासाठी चढाओढ दिसेल. 


झिम्बाब्वेच्या सिकंदर रझानेही चमकदार कामगिरी केली. झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानसारख्या तगड्या संघाना आता झालेल्या वर्ल्ड कपमध्ये धूळ चारली आहे.  त्याच्यावरही पंजाब किंग्ज, लखनौ, कोलकाता आणि मुंबईसह अनेक संघांची नजर असेल. यावेळी केन विल्यमसनलाही सनरायझर्स हैदराबादने सोडले, त्यामुळे त्याच्यावरही अनेक संघांची नजर असेल.


इंग्लंडला वनडे आणि टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या बेन स्टोक्सवर सर्वांची नजर असणार आहे. स्टोक्सने वनडेतून निवृत्ती घेतली आहे. बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे त्याचा संघाला नेहमीच फायदा होतो. त्यासोबतच तो एक उत्कृष्ट फिल्डरही आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. त्याच्यासोबत वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावणाऱ्या सॅन करनवरही सर्वांची नजर असणार आहे.