मुंबई :  भारताची सुवर्णकन्या हिमा दासने (Hima Das) पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. हिमाने महिन्याभरात पाच सुवर्ण पदके पटकावण्याचा विक्रम केला आहे. चेक रिपब्लिक येथील मेटूजी ग्रँड प्रिक्स (Nove Mesto nad Metuji Grand Prix) अॅथलेटिक्स स्पर्धेत  महिलांच्या ४०० मीटरच्या शर्यतीत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. हिमाने ५२.०९ सेंकदात हे अंतर पार केले. हिमा दास हिने पाचवे सुवर्ण पदक पटाकावल्याने भारतीयाच्या माना उंचाविल्या आहेत. १९ वर्षीय हिमा दासच्या या कामगिरी बद्दल भारतात नाही तर जगात सुद्धा चर्चा होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तिची सहायक वी.के विसमाया हिने २३.४३ सेकंदाचा वेळ घेत दुसरा क्रमांक पटकावला. ही या हंगामातील सगळ्यात चांगली कामगिरी आहे. हिमा दासने पहिले सुवर्णपदक २ जुलै जिंकले होते. हिमाने युरोपमध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये हिमाने चौथे सुवर्णपदक जिंकले होते. 


सुवर्णपदक जिंकल्यानंतर हिमाने ट्विट केले आहे की, आज २०० मीटरमध्ये पुन्हा एक सुवर्णपदक जिंकले. टाबोर अॅथलेटिक्स टूर्नामेंटमध्ये (Tabor Athletics Meet in Czech) Republic) २०० मीटर स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते.



आसामच्या हिमा दासने बुधवारी झालेली शर्यत २३.२५ सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदक स्वत:च्या नावावर केले. हिमा दासने २ जुलैला झालेल्या पोलँडमध्ये झालेल्या पहिल्या रेसमध्ये २३.६५ सेकंदात विजय मिळवला होता. नंतर कुंटो अॅथलेटिक्स टूर्नामेंटमध्ये २०० मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत २३.९७ सेंकदात इतक अंतर पार करून गोल्ड मेडल हिमाने स्वता:च्या नावावर केले. त्यानंतर क्लांदो अॅथलेटिक्स टूर्नामेंटमध्ये हिमाने तीसरा सुवर्णपदक जिंकले.



१७ जुलैला झालेल्या टाबोर ग्रँड प्रिक्समधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पटकावले आहे. मेमोरियल आसाममध्ये आलेल्या पुराबद्दल हेमाने चिंता व्यक्त केली होती. हिमाने पूरग्रस्तांसाठी तिचा अर्धा पगार देण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर तिने व्यापाऱ्यांना देखील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचं आव्हान केले होते.