Siddharth Sharma passed away : क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या युवा खेळाडूचं निधन झालंय. सिद्धार्थ शर्मा असं मृत खेळाडूचं नाव आहे. (Siddharth Sharma passed away marathi News) रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी गुजरातला गेलेल्या सिद्धार्थची अचानक तब्येत बिघडली. वडोदरामध्येच एका रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं अखेर वयाच्या 28 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. (Himachal Pradesh young cricketer Siddharth Sharma passed away latest marathi Sport News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्याचा रहिवासी होता, सिद्धार्थ वेगवान गोलंदाज होता. त्याने राज्यासाठी 6 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्याने 25 बळी घेतले. लिस्ट ए मॅच खेळताना त्याने 8 विकेट्स घेतल्या. त्याने एक टी-20 सामनाही खेळला होता.


सिद्धार्थ शर्माच्या निधनामुळे क्रिकेट शोककळा पसरली आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सख्खू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, आमदार सतपाल सिंग सत्ती, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेंद्र शर्मा आणि इतरांनी क्रिकेटर सिद्धार्थ शर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 


 




20 डिसेंबर 2022 पासून हिमाचल आणि बंगाल यांच्यात रणजी सामना खेळला गेला. या सामन्याच्या पहिल्या डावात सिद्धार्थने 69 धावांत पाच विकेट्स घेतल्या. बंगाल पहिल्या डावात 310 धावांवर ऑलआऊट झाला होता. सिद्धार्थने दुसऱ्या डावातही दोन विकेट घेतल्या. 


दरम्यान, या सामन्यात सिद्धार्थने टीम इंडियाचा अष्टपैलू शाहबाज अहमदची विकेटही घेतली होती. या सामन्यात सिद्धार्थ आपल्या संघाचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. योगायोग असा की सिद्धार्थने 2017 साली पदार्पण करताना बंगालविरूद्धच केलं होतं आणि शेवटचा सामनाही त्याने बंगालविरूद्ध खेळला.