मुंबई : विराट कोहलीकडे असलेलं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून ते रोहित शर्माला देण्यात आलं. रोहित आपल्या वनडे कॅप्टन्सीचा श्रीगणेशा हा आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपासून करणार आहे. रोहितला कर्णधार करण्याच्या निर्णयाचं काही चाहते समर्थन करत आहेत. तर काही जणांकडून कडाडून विरोध केला जातोय. या सर्व प्रकरणावरुन स्वत: रोहित शर्माने एकदिवसीय संघाचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. (Hitman Rohit Sharma give 1st reaction after who taking charges of odi team captaincy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. लोकं काय बोलतात याने मला काही फरक पडत नाही. आपलं लक्षं हे लक्ष्य साध्य करण्यावर असायला हवं, असं रोहित म्हणाला आहे. रोहितने कर्णधार झाल्यानंतर एक विशेश मुलाखत दिली. या मुलाखतीचा व्हीडिओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.  


रोहित काय म्हणाला?


"टीम इंडियासाठी खेळताना अधिक दबाव असतो. जो नेहमीच असतो. लोकं तुमच्याबद्दल चांगलंही बोलतात आणि वाईटही. वैयक्तिक पातळीवर एक क्रिकेटरच्या नात्याने आपल्या कामगिरीवर लक्ष देणं म्हत्त्वाचं आहे. लोकं काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. लोकांनी काय म्हणावं यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. हे मी आधीही सांगितलंय आणि आताही सांगतोय. हा मेसेज टीमसाठीही आहे", असं रोहित म्हणाला. 


"जेव्हा आपण मोठ्या स्पर्धेत खेळतो तेव्हा अनेक मुद्द्यांवर बोट ठेवलं जातं. पण आपण त्यावरच लक्ष द्यायला हवं जे आपल्या हातात आहे. सामना खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आपण ओळखलो जातो. आपल्याबद्दल बाहेर काय चर्चा आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपण एकमेकांबाबत काय विचार करतो, हे महत्त्वाचं आहे", अशा शब्दात रोहितने टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युतर दिलंय.


"खेळाडूंमध्ये खेळीमेळीचं वातावरण आणि नातं असण्याची आवश्यकता आहे. सहकार्याची भावना असायला हवी. ज्यामुळे आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत होईल. यासाठी कोच राहुल द्रविड सहकार्य करत आहे, असंही रोहितने सांगितलं.