Rohit Sharma | टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी रोहितची शर्माची निवड
विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाचं कर्णधारपद (Test Team Captaincy) रिक्त होतं.
मुंबई : विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाचं कर्णधारपद (Test Team Captaincy) रिक्त होतं. त्यामुळे टीम इंडियाचा पुढील टेस्ट कॅप्टन कोण होणार, याबाबतची जोरदार चर्चा ही क्रिकेट वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. टीम इंडियाला कायमस्वरुपी कसोटी कर्णधार मिळाला आहे. आयसीसीने ट्विट करत कसोटी कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. (hitman rohit sharma selected as india test team captain)
बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी निवड केली आहे. त्यामुळे आता यापुढे रोहित शर्माच कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.