Australia vs Sri Lanka, World Cup 2023 : वर्ल्ड कप सुरू होण्याआधी कमीतकमी 6 महिनेआधीच वेळापत्रक जाहीर होतं. मात्र, यंदाच्या वर्षी वेळापत्रक (World Cup 2023) जाहीर होण्यासाठी उशीर झाला. फक्त महिनाभर आधी वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं. त्यातही सणावळ्यांमुळे सामन्याच्या तारखांमध्ये फेरबदल करण्यात आले. त्यामुळे एकंदरीत पूर्ण नियोजन सेट होण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे योग्य नियोजन करताना बीसीसीआयचा  (BCCI) कस लागला. अशातच आता बीसीसीआयच्या नियोजनाचं पितळ उघडं पडलं आहे. वर्ल्ड कपच्या 14 व्या सामन्यात (Australia vs Sri Lanka) धक्कादायक घटना पहायला मिळाली. प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळल्याने (Hoardings fall) आता प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका (AFG vs SL) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 210 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाने आव्हान पूर्ण केलं अन् श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये चाहत्यांनी हजेरी लावली होती. सामना संपल्यानंतर  प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळलं. लखनऊमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यानंतर स्टेडियमवरचे पत्रे उडून पडाल्याचं दिसून आलं. त्यावेळी स्टेडियमच्या खुर्च्यावर कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. उरलेल्या प्रेक्षकांनी पळ काढला अन् जीव वाचवला. वादळी वाऱ्यामुळे खेळाडूंसोबत चाहते देखील हैराण झाले होते.


स्टेडियमचे पत्रे वाऱ्यासारखे कोलंट्या उड्या घेत खुर्च्यांवर पडत होते, त्यामुळे प्रेक्षकांना धास्ती बसली. काहींनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तर कॅमेरामॅन देखील मैदानाच्या दिशेने धावले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या सामन्यात अशी व्यवस्था असल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


पाहा Video



श्रीलंका : कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.


ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.