आशिया चषक हॉकी: भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
ढाका : आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
सध्या आशिया चषक हॉकी स्पर्धा बांगलादेशमधील ढाका येथे होत आहे. मात्र, ढाकामध्ये सुरु असलेल्या पावसामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या मॅचला उशीर होणार आहे.
पावसामुळे मॅचच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता नव्या वेळेनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारी मॅच सायंकाळी ५ ऐवजी ६.३० मिनिटांनी सुरु होणार आहे.
आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा दुसरा मुकाबला होणार आहे. यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये भारतीय हॉकी टीमने पाकिस्तानचा पराभव केला होता.
बांगलादेशात सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत दोन दिवसांपूर्वी भारताने मलेशियावर ६-२ ने मात केली. मलेशियावर मात करत भारतीय हॉकी टीमने या स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखलं आहे.