Hockey World Cup 2023 Schedule: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. साखळी फेरीतील सामने संपले असून आता क्रॉसओव्हर सामन्यांना सुरुवात होणार आहे. ग्रुप डी गटात भारताची कामगिरी हवी तशी झाली नाही त्यामुळे आता क्रॉसओव्हरमधील सामना खेळावा लागणार आहे. यानंतरच भारताची उपांत्यपूर्व फेरीत वर्णी लागणार आहे. तत्पूर्वी चार गटातील अव्वल स्थानी असलेल्या चार संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तर आठ संघ क्रॉसओव्हर फेरीत आपलं नशिब आजमवणार आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका, जापान, चिले आणि वेल्स या चार संघांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.


या चार संघाची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत एकूण चार गट असून त्या प्रत्येक गटातील अव्वल स्थानी असलेले संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. ग्रुप ए मधून ऑस्ट्रेलिया, ग्रुप बी मधून बेल्जियम, ग्रुप सी मधून नेदरलँड आणि ग्रुप डी मधून इंग्लंडची वर्णी उपांत्यपूर्व फेरीत लागली आहे. 


या आठ संघांमध्ये क्रॉसओव्हर सामने होणार


चार गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांना उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. गट ए मधून अर्जेंटिना आणि फ्रान्स, गट बी मधून जर्मनी आणि कोरिया, गट सी मधून मलेशिया आणि न्यूझीलंड, गट डी मधून भारत आणि स्पेन या आठ संघाना क्रॉसओव्हर सामना खेळावा लागणार आहे.


बातमी वाचा- Sikander Sheikh : महाराष्ट्र केसरी हुकली, पण सिकंदरने मोठ्या स्पर्धेच मारलं मैदान


कॉसओव्हर फेरीतील सामने


  • मलेशिया विरुद्ध स्पेन (22 जानेवारी 2023, वेळ: संध्याकाळी 4.30 वाजता) (विजयी संघांची उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ)

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (22 जानेवारी 2023, वेळ: संध्याकाळी 7.00 वाजता)  (विजयी संघांची उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमशी गाठ)

  • जर्मनी विरुद्ध फ्रान्स (23 जानेवारी 2023, वेळ: संध्याकाळी 4.30 वाजता) (विजयी संघांची उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडशी गाठ)

  • अर्जेंटिना विरुद्ध कोरिया (23 जानेवारी 2023, वेळ: संध्याकाळी 7.00 वाजता)  (विजयी संघांची उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडशी गाठ)