Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. भारतानं या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. स्पेनला 2-1 ने पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण ग्रुप डी मध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे. त्यामुळे भारताला यासाठी वेल्सला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागणार आहे. ग्रुप डी मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी असल्यास क्रॉसओव्हर फेरीला सामोरं जात उपांत्य फेरी गाठावी लागणार आहे. 


इंग्लंड विरुद्ध स्पेन सामन्यावर नजर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरुद्ध स्पेन सामना 19 जानेवारी 2023 रोजी भुवनेश्वर मैदानात रंगणार आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींची नजर असणार आहे. कारण थेट उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी जर तर वर गणित अवलंबून आहे. कारण इंग्लंडने पहिल्या सामन्यात वेल्सचा 5-0 ने पराभव केला. त्यामुळे दोन गुणांसह पारड्यात 5 गोलची भर पडली. तर भारताविरुद्धचा सामना गोलरहित 0-0 ने बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघाच्या पारड्यात प्रत्येकी दोन गुण पडले. इंग्लंड गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताइतकेच 4 गुण असले तरी वेल्सला 5 गोलने पराभूत केल्याने पहिल्या स्थानी आहे. 


बातमी वाचा- Hockey World Cup 2023 स्पर्धेत जापानचं आव्हान संपुष्टात! कोरियानं पाजलं पराभवाचं पाणी


भारताला उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी 


  • पहिली शक्यता: इंग्लंडने स्पेन विरुद्धचा सामना गमवल्यास भारताला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवता येईल. पण भारताला वेल्सला पराभूत करावं लागेल. 

  • दुसरी शक्यता: इंग्लंडने स्पेन पराभूत केल्यास भारताला वेल्स विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. कारण गुण सारखे असले तरी उपांत्यपूर्व फेरीचं गणित गोलवर अवलंबून असेल.


बातमी वाचा- Hockey WC 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन 'हा' नियम बदलण्याच्या विचारात, कारण...


भारत दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी राहिल्यास...


भारतीय हॉकी संघ गट डी मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी राहिल्यास क्रॉसओव्हर फेरीला सामोरं जावं लागेल. या फेरीत साखळी फेरीसारखंच गट सी मधील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी सामना करावा लागेल. त्यात भारताची स्थिती चांगली असल्यास उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळेल.


  • गट सी मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ X गट डी मधील तिसऱ्या क्रमांकाचा संघ

  • गट डी मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ X गट सी मधील तिसऱ्या क्रमांकाचा संघ


क्रॉसओव्हर सामन्यात सध्यातरी असं शेड्युल असेल. त्यानंतर या गटातील विजयी पराभूत संघ एकमेकांशी पुढच्या फेरीत भिडतील. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळेल.