Hockey WC 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन 'हा' नियम बदलण्याच्या विचारात, कारण...

Hockey Rules: हॉकी खेळात आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. हॉकी खेळानं आतापर्यंत अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. मैदानी हॉकीची जागा आता टर्फनं घेतली आहे. आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन नवा बदल करण्याच्या विचारात आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तय्यब इक्रम यांनी मीडियाशी बोलतानी ही माहिती सांगितली.

Updated: Jan 16, 2023, 06:52 PM IST
Hockey WC 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन 'हा' नियम बदलण्याच्या विचारात, कारण... title=

Hockey World Cup 2023 Penalty Corner Rules: हॉकी खेळात आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. हॉकी खेळानं आतापर्यंत अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत.  मैदानी हॉकीची जागा आता टर्फनं घेतली आहे. तसेच लाकडी स्टीकच्या जागी फायबरने बनवलेल्या स्टीक आली आहे. हॉकी स्टिक्स कार्बन, फायबरग्लास आणि अरामिड यांसारख्या अधिक बळकट पदार्थांनी बनलेल्या असतात. आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन नवा बदल करण्याच्या विचारात आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तय्यब इक्रम यांनी मीडियाशी बोलतानी ही माहिती सांगितली. हा नवा नियम पेनल्टी कॉर्नरबाबत असणार आहे. पेनल्टी कॉर्नर शॉट्स (ड्रॅग अँड फ्लिक्स) असा खेळला जातो. हा शॉट्स 150 किमी प्रतितास वेगाने असतो. त्यामुळे गोल वाचवणाऱ्या खेळाडूंना गंभीर दुखापत होऊ शकते. यामध्ये कॉर्नवरील खेळाडूने ड्रॅग करून चेंडू फ्लिक करणाऱ्या खेळाडूकडे ढकलतो. त्यानंतर गोलमधील खेळाडू फ्लिक करणाऱ्या खेळाडूकडे धाव घेतात. त्यामुळे तो खेळाडू अतिवेगाने चेंडू गोलच्या दिशेने भिरकावतो. चेंडूचा वेग पाहता एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत होऊ शकते.

"खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या फक्त या नियमाचा अभ्यास केला जात आहे. आमची प्राथमिकता खेळाडूंच्या संरक्षणाला असेल. त्यावर आम्ही काम करत आहोत. लवकरच आम्ही नवा प्रयोगासह मैदानात उतरू.", असं तय्यब इक्रम यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. 

बातमी वाचा- Hockey World Cup 2023 स्पर्धेत इंग्लंडची क्रिकेट नीति, Bazball स्ट्रॅटर्जी नक्की आहे तरी काय? वाचा

2021 ज्युनियर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत हा प्रयोग यापूर्वी करण्यात आला होता. पेनल्टी कॉर्नरदरम्यान खेळाडूंना 23 मीटरच्या आत संरक्षण कवच घालण्याची परवानगी होती. दुसरीकडे, ड्रॅग-फ्लिक व्यतिरिक्त, पेनल्टी-कॉर्नर दरम्यान खेळाडूंच्या गर्दीमध्ये घेतलेल्या शॉट्सबद्दल सुरक्षिततेची चिंता आहे. त्यामुळे नजीकच्या काळात प्रयोग होऊ शकतात. हा प्रयोग प्रो लीग स्पर्धेदरम्यान केला जाऊ शकतो. असं असलं तरी पॅरिस 2024 ऑलिम्पिकपर्यंत पेनल्टी कॉर्नरच्या नियमात कोणताही बदल होणार नाही, हेही तितकंच खरं आहे.