टाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार
Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे.
Hockey World Cup 2023 : देशात उद्या 13 जानेवारी पासून हॉकी वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. 48 वर्षानंतर हॉकी वर्ल्ड कपवर (Hockey World Cup 2023) नाव कोरण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या संघात शेतकऱ्याच्या मुलालाही संधी मिळाली आहे. या शेतकऱ्याच्या मुलाकडे एकेकाळी घरात लालटेन (कंदील) घ्यायला पैसे नव्हते, मात्र आता तो भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. हा खेळाडू नेमका कोण आहे? किती दुर्गम भागातून तो आला आहे? व त्याची आर्थिक परिस्थिती कशी होती, हे जाणून घेऊयात.
भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे.
फाटलेल्या जाळीवर गोल पोस्ट करायचा
निलम एक्सेस (Nilam Xess) हा अतिशय दुर्गम भागातून येतो. त्याच्या घरी लाईट देखील नव्हती. निलमने वयाच्या 7 वर्षापासून हॉकी खेळायला सुरूवात केली होती. तसेच त्याच्या गावाची लोकसंख्या राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमच्या आसन क्षमतेपेक्षा कमी आहे. परंतू गावात हॉकीची क्रेझ अफाट आहे. निलमने गवतही नसलेल्या मैदानात हॉकी खेळायला सुरुवात केली होती. तसेच त्याची दोन्ही गोलपोस्टची जाळी देखील फाटलेली असायची. या फाटलेल्या जाळीत तो गोल करायचा.
शाळेच्या सुट्टीत मी माझ्या भावासोबत खेळायचो. घरी आल्यावर आई-वडिलांना बटाटा आणि फुलकोबीच्या शेतात मदत करायचो. संध्याकाळी गावातील लोक हॉकी खेळायला भेटायचे. मी त्यांच्याबरोबर खेळायचो,असे निलम एक्सेस (Nilam Xess) म्हणालाय.
घरात लाईट नव्हती
गावात 2017 पर्यंत वीज नव्हती. तोपर्यंत आम्ही अंधारात राहायचो. आम्हाला कंदीलही (लालटेन) विकत घेता आला नाही. त्यामुळे घरातल्या छोट्य़ा बाटल्यावर एक लहान छिद्र करून त्यात रॉकेलचे तेल टाकून ती जाळायचो. अशाप्रकारे आमच्या घरी उजेड यायचा आणि उजेडाखाली आम्ही आमची रात्र काढायचो असे निलमचे (Nilam Xess)वडील बिपिन सांगतात.
टाईमपाससाठी हॉकी खेळायचा
लहानपणी निलम टाईमपास म्हणून हॉकी खेळायचा.मात्र 2010 मध्ये सर्व काही बदलले. त्याची सुंदरगढच्या क्रीडा वसतिगृहासाठी निवड झाली होती. मला तेव्हा समजले की हॉकी खेळूनही पैसे कमावता येतात. तुम्हाला मान मिळतो. त्यामुळेच मी खेळाडू होण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानंतर मी लंडन ऑलिम्पिक 2012 पाहिली. त्यानंतर मी भारताकडून खेळण्याचे ध्येय ठेवले, असे निलम (Nilam Xess) म्हणतो.
दरम्यान आता निलमचे (Nilam Xess) भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. उद्यापासून तो वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. यामध्ये तो भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.