मुंबई : एकेकाळी WWE मध्ये अधिराज्य करणारा 'द रॉक' आता हॉलिवूडमध्ये स्टार झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉक म्हणजेच डवेन जॉनसन नुकताच भारतामध्ये आला होता. एका मुलाखतीदरम्यान WWE, चित्रपट यानंतर त्याने क्रिकेटमध्ये हात आजमावून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


प्रियांका चोप्रा सोबत काम 


जॉनसनने प्रियांका चोप्रासोबत बेवॉच चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. सध्या जॉनसन त्याचा आगामी चित्रपट ' जुमानजी : वेलकम टू द जंगल' यासाठी भारतामध्ये आला होता. 


टी २० मॅचमध्ये व्यक्त केली इच्छा 


भारत श्रीलंकेदरम्यान टी २० चा तिसरा सामना नुकताच पार पडला त्यावेळी जॉनसनने मुलाखत देताना त्याचे भारतीय चाहते आणि त्यांचे प्रेम याबद्दल त्याने कौतुक केले. भारतीयांमध्ये चैतन्य निर्माण करणारा क्रिकेट हा खेळ खेळायला मला आवडेल असे त्याने सांगितले आहे.