दुबई : मॅच फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने तीन क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. आयसीसीने हाँगकाँगचे क्रिकेटपटू इरफान अहमद आणि नदीम अहमद यांच्यावर कायमची बंदी घातली आहे. याचसोबत हाँगकाँगच्या टीममधला आणखी एक खेळाडू हसीब अमजद याच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. इरफान अहमद आणि नदीम अहमद हे भाऊ आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार हे तिन्ही खेळाडू आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी लवादाने केलेल्या चौकशीत दोषी आढळले. या खेळाडूंनी मागच्या २ वर्षात अनेक मॅच फिक्स केल्या. या खेळाडूंनी मॅचचा निकाल प्रभावित करण्यासाठी लाच घेतली. 


इरफानने १३ जानेवारी २०१४ ला हाँगकाँग विरुद्ध स्कॉटलंड या मॅचमध्ये, १७ जानेवारी २०१४ साली हाँगकाँग-कॅनडा मॅचमध्ये, १२ मार्च २०१४ ला झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये फिक्सिंग केलं. इरफानने हाँगकाँगसाठी ६ वनडे आणि ८ टी-२० मॅच खेळल्या होत्या.