दुबई :  इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कपसाठी रवाना होईल. १५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरुवात होतेय. आशिया कपमधील सहावी टीमही आता निश्चित झाली आहे. आशिया कप क्वालिफायर स्पर्धा जिंकल्यामुळे हाँगकाँगची टीम आशिया कप खेळेल. हाँगकाँगच्या टीमला भारताच्याच ग्रुपमध्ये स्थान मिळालं आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या ६ टीमचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे देश ग्रुप एमध्ये तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान ग्रुप बीमध्ये आहेत. प्रत्येक ग्रुपमधील २-२ टीम अशा एकूण ४ टीम सुपर ४ मध्ये जातील. सुपर-४ मध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळेल आणि सुपर-४ मधल्या टॉप २ टीम फायनलमध्ये खेळतील. २८ सप्टेंबरला आशिया कपची फायनल खेळवण्यात येईल.


भारत-पाकिस्तानचा सामना


आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान कमीत कमी दोनवेळा एकमेकांविरुद्ध खेळतील असं या वेळापत्रकावरून दिसत आहे. १९ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये ग्रुप स्टेजमधला सामना होईल. यानंतर सुपर-४मध्येही या दोन्ही टीम एकमेकांना भिडतील याची दाट शक्यता आहे. अबु धाबी आणि दुबई या दोन ठिकाणी आशिया कपचे सामने होणार आहेत.


आशिया कपमधील भारताचे सामने


१८ सप्टेंबर- भारत विरुद्ध हाँगकाँग


१९ सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान


आशिया कपसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व असेल.


भारतीय टीम


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), के एल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि खलील अहमद


आशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक


१५ सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (दुबई)


१६ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (दुबई)


१७ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (अबुधाबी)


१८ सप्टेंबर: भारत विरुद्ध क्वालिफायर (दुबई)


१९ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)


२० सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (अबुधाबी)


सुपर फोर:


२१ सप्टेंबर: ग्रुप ए विजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (दुबई)


ग्रुप बी विजेता विरुद्ध ग्रुप ए उपविजेता (अबूधाबी)


२३ सप्टेंबर: गट अ विजेता विरुद्ध ग्रुप ए उपविजेता (दुबई)


ग्रुप बी विजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (अबुधाबी)


२५ सप्टेंबर: गट अ विजेता विरुद्ध गट ब विजेता (दुबई)


२६ सप्टेंबर: ग्रुप ए उपविजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (अबु धाबी)


२८ सप्टेंबर : अंतिम लढत (दुबई)