कोच लेहमन यांना क्लीनचीट, पीटरसननं अशी दिली प्रतिक्रिया...
ऑस्ट्रेलिया टीमचे कोच डेरेन लेहमन यांना बॉल कुरतडल्या प्रकरणी क्लीन चीट मिळालीय. परंतु, अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. लेहमन यांनी `कोणत्याही किंमतीत जिंकायचंच` अशी जी मानसिकता टीममध्ये निर्माण केलीय, त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सिडनी : ऑस्ट्रेलिया टीमचे कोच डेरेन लेहमन यांना बॉल कुरतडल्या प्रकरणी क्लीन चीट मिळालीय. परंतु, अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. लेहमन यांनी 'कोणत्याही किंमतीत जिंकायचंच' अशी जी मानसिकता टीममध्ये निर्माण केलीय, त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
लेहमन यांना क्लीन चीट दिल्यानंतर माजी इंग्लिश क्रिकेटर केविन पीटरसन यानंही एक ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या प्रकरणी कॅप्टन स्टीव स्मिथ, उप-कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आणि सलामीवीर कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचार संहितेच्या उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्याचं म्हटलंय. त्यांना टेस्ट सीरीजमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. टीम पेन कॅप्टनपदी कायम राहणार आहे. तर मुख्य कोच डेरेन लेहमन यांना क्लीनचीट देण्यात आलीय. जेम्स सदरलँड यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल माफीही मागितलीय.
असं असलं तरीही या प्रकरणात लेहमन यांनाच या प्रकरणासाठी जबाबदार मानलं जात आहे. त्यांच्यावर टीममध्ये दूषित संस्कृती भरण्याचा आरोप केला जातोय. याचमुळे आज ऑस्ट्रेलिया टीमवर तोंड लपवण्याची वेळ आलीय, असंही मानलं जातंय.
'लेहमनच दोषी'
ऑस्ट्रेलिया टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क यानं या संपूर्ण प्रकरणात कोच डेरेन लेहमन हेदेखील समप्रमाणात दोषी असल्याचं म्हटलंय. 'कोचला या प्रकरणाची माहिती नसेल तर तेही या प्रकरणात तितकेच दोषी आहेत जितके स्टिव स्मिथ आणि टीममधील बाकी खेळाडू' असं क्लार्कनं म्हटलंय.