Ishan Kishan: टीम इंडियातून अचानक कसा गायब झाला इशान किशन? भोगतोय नाराजीची शिक्षा
Ishan Kishan: नुकंतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिरीजमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे ईशान किशनने सहभाग घेतला नव्हता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन ( Ishan Kishan ) कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे.
Ishan Kishan: 11 जानेवारीपासून भारत विरूद्ध अफगाणिस्तान ( IND vs AFG ) यांच्यातील टी-20 सिरीजला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकप तोंडावर असताना ही टीम इंडियासाठी ( Team India ) शेवटची आंतरराष्ट्रीय सिरीज असणार आहे. यासाठी बीसीसीआयने ( BCCI ) देखील अनेक गोष्टींचा विचार केला असून रोहित शर्मा ( Rohit sharma ) आणि विराट कोहलीची ( Virat kohli ) पुन्हा टी-20 फॉर्मेटमध्ये निवड केली आहे.
दरम्यान या दोन वरिष्ठ खेळाडूंची वर्ल्डकपसाठी निवड होणार असेल तर ईशान किशन ( Ishan Kishan ), तिलक वर्मा आणि जितेश शर्मा या नवख्या खेळाडूंना संधी मिळणं कठीण मानलं जातंय. नुकंतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिरीजमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे ईशान किशनने सहभाग घेतला नव्हता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन ( Ishan Kishan ) कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर ईशान किशन नाराज?
अनेक मिडीया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इशान किशनला ( Ishan Kishan ) फारशी संधी मिळाली नाही. तो बराच काळ टीममध्ये होता, मात्र तो खूश नव्हता. सध्या ईशान किशनने ( Ishan Kishan ) ब्रेक घेतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सिलेक्टर्स इशान किशनला पर्याय शोधतायत.
ईशान किशनला पर्याय कोणता खेळाडू असू शकतो?
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये जितेश शर्माला इशान किशनपेक्षा ( Ishan Kishan ) प्राधान्य देण्यात आलं होतं. याशिवाय वनडे सिरीजमध्येही संजू सॅमसनला संधी देण्यात आली. टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ व्यवस्थापन इशान किशनला ( Ishan Kishan ) पर्याय शोधत असल्याचं मानण्यात येतंय. अशातच आता टी-20 वर्ल्डकपसाठी टीम मॅनेजमेंट कोणत्या विकेटकीपरच्या नावाचा विचार करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अफगानिस्तान सिरीजसाठी टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, अवेश खान आणि मुकेश कुमार.