Jasprit Bumrah Yorker Video : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 2nd Test) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जातोय. विशाखापट्टणमच्या मैदानात भारतीय खेळाडू मागील सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात ओली पोप (Ollie Pope) याच्या शतकीय खेळीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. मात्र, पहिल्या कसोटी सामन्यात झालेली चूक रोहितने पुन्हा केली नाही. ओली पोपला सेट होण्याआधीच जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) परतीचा रस्ता दाखवलाय. बुमराहच्या परफेक्ट यॉर्करसमोर ओलीचा कशी विकेट पडाली त्याचा व्हिडीओ (Cricket Video) समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 396 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं होतं. यशस्वी जयस्वालच्या द्विशतकीय खेळीमुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठा डोंगर उभारता आला. यशस्वीने पहिल्या डावात 209 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 19 फोर आणि 7 सिक्सचा देखील समावेश आहे. टीम इंडियाने गोलंदाजी करताना देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. कुलदीप यादव आणि अक्षरने सलामी जोडी फोडल्यानंतर बुमराहने आपल्या यॉर्करचा प्रहार सुरू केला. त्यावेळी त्याने ओली पोपच्या दांड्या उडवल्याचं दिसून आलं.


झालं असं की, 114 वर 2 विकेट अशी परिस्थिती असताना टीम इंडियाला विकेट्सची गरज होती. त्यावेळी बुमाराहने जो रुटला बाद केल्यानंतर ओली पोप याला 28 व्या ओव्हरमध्ये तंबूत पाठवलं. ओव्हरच्या 5 व्या बॉलवर बुमराहचा आत येणारा बॉल ओली पोपला खेळता आला नाही आणि तिन्ही स्टंप्स उडाले. बुमराहने ओली पोपला आपल्या प्लॅनच्या जाळ्यात अडकवलं. बुमराहने पहिले चार बॉल ऑफ स्टंप्सला ठेवले अन् पाचवा बॉल यॉर्कर केला. त्यामुळे ओलीला काही समजण्याच्या आत इंग्लंडची 4 थी विकेट गेली होती.



इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.


भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.